⚡बांदा ता.१८-: बांदा पानवळ येथून महेंद्र वसंत हडफडकर (वय ५३) हे मंगळवार दिनांक १६ पासून बेपत्ता झाले असून त्याबबताची तक्रार बांदा पोलिसात देण्यात आली आहे.
संजना हडफडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महेंद्र हे मूक व बधिर असून मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या आईला बांदा येथे जाऊन येतो असे खुणेने सांगितले. बांदा बसस्थानक येथे त्यांना पाहण्यात आले. त्यांचा रंग गोरा असून केस कुरळे आहेत. अंगात काळ्या रंगाचा रेनकोट परिधान केला आहे. कोणाला ही व्यक्ती आढळून आल्यास बांदा पोलीस ठाणे (०२३६३-२७०२३३) येथे संपर्क साधण्याचे आवाहन तपासी अंमलदार एस. एस. नाईक यांनी केले आहे.
बांदा येथील इसम बेपत्ता…
