पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले संजय नाईक कुटुंबीयांचे सांत्वन…

⚡मालवण ता.१६-: पेंडूर गावच्या विकासात्मक कामांबाबत संजय नाईक यांच्याशी चर्चा झाली होती. मात्र नाईक सर यांच्या अकाली जाण्याने पेंडूर गावात भाजप पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रत्येक वाडीवाडीतील कार्यकर्ता जपणारा असा आमचा सहकारी होता. पण नाईक सरांसोबत ज्या कामांबरोबर चर्चा झाली ती कामे निश्चितच पूर्ण करू हीच सरांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली

मालवण तालुक्यातील पेंडूर गावचे माजी सरपंच, वराडकर हायस्कूल कट्टा प्रशालेचे मुख्याध्यापक कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टाचे संचालक संजय नाईक सर यांचे
नुकतेच अकाली निधन झाले. या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण तालुक्यातील पेंडूर येथे नाईक सर यांच्या निवासस्थानी जाऊन नाईक कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. पालकमंत्री चव्हाण हे मूळ पेंडूर खरारे गावचे सुपुत्र असल्यामुळे अल्पावधीतच काळात नाईक सर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले होते.

यावेळी आनंद उर्फ भाई सावंत, राजन वराडकर, सचिन आंबेडकर, सरपंच स्नेहा परब ,उपसरपंच सुमित सावंत, शेखर फोंडेकर, माजी सरपंच साबाजी सावंत, सत्यवान पाटील, रविंद्र गावडे गजानन सावंत, अजित सावंत व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page