⚡मालवण ता.१६-:
सनातन संस्थेतर्फे दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळेत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्री व्यासपूजा आणि प. पू भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन, साधकांचे अनुभवकथन आणि हितचिंतकांचा सत्कार, राष्ट्र आणि धर्म या संदर्भातील कार्याविषयी मान्यवरांचे विचार, तसेच ‘आनंदप्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना’ याविषयी व्याख्यान, लघुपट, ग्रंथ आणि फलक प्रदर्शन व स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कारण्यात आले आहे.
मालवणात २१ रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम…
