सावंतवाडी मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असताना आपण मित्र पक्षांच्या पालख्या का उचलाव्यात..?

राजन तेलींचा सवाल: विद्यमान आमदार सावंतवाडी मतदारसंघात विकास करण्यात अपयशी ठरले..

⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीतील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, सोसायटी इत्यादींवर भाजपचे वर्चस्व असताना आपण मित्र पक्षाच्या पालख्या का उचलाव्यात असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी उपस्थित केला असून, ज्या प्रमाणे आपण लोकसभेत विजय मिळवला तसाच सावंतवाडी विधानसभा मतदार संघात देखील कमळ चिन्हावर विजय मिळवू यासाठी कामाला लागा असे आवाहन भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केला आहे.

याबाबत श्री तेली यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात असे म्हटले आहे की सावंतवाडीचे विद्यमान आमदार गेली १५ वर्ष आमदार असून, ८ वर्ष मंत्री आहेत. तरी देखील या मतदार संघाचा विकास झाला नसून, येथील तरुणांना नोकरीसाठी घराला कुलूप लावून मुंबई ला जावे लागत आहे. तर अनेक तरुण रात्री- अपरात्री जीवावर उदार होऊन प्रवास करत गोवा राज्यात जाऊन काम करत आहेत. यावेळी अनेक तरुणांचा अपघात होऊन मृत्यू झाला असल्याचे देखील ते म्हणाले.

You cannot copy content of this page