आम. वैभव नाईक व ठाकरे शिवसेनेतर्फे दांडी शाळा व कुडाळकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

⚡मालवण ता.१६-: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी दांडी शाळा येथे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितिन वाळके, उपजिल्हा संघटक सेजल परब, विभागप्रमुख प्रविण लुडबे, मंदार केणी, यतीन खोत, तालुका संघटक दीपा शिंदे, युवतीसेना तालुका संघटक निनाक्षी मेथर, उपशहरप्रमुख सन्मेश परब, शिवसेना शाखा प्रमुख बंड्या सरमळकर, तपस्वी मयेकर, सोशल मीडिया तालुका प्रमुख सिद्धेश मांजरेकर, युवासेना उपशहरप्रमुख अक्षय रेवंडकर, युवतीसेना उपतालुका अधिकारी रूपा कुडाळकर, युवतीसेना शहरप्रमुख सूर्वी लोणे, युवतीसेना उपशहरप्रमुख माधुरी प्रभू, युवतीसेना उपविभागप्रमुख सोनाली डीचवलकर, दांडी शाळा मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, शिवराज सावंत, मनिषा ठाकूर, अमृता राणे, पंकज धुरी तसेच कुडाळकर हायस्कूल येथे मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर मॅडम, अजय शिंदे, सुनिल आचार्य, शिल्पाकिरण साटम, महादेव नाईक, सारीका शिंदे, शर्मिला गावकर, संजय राठोड,दिनेश खोत, संदीप बाणे आदी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page