बाजारपेठेत पोलीस प्रशासनाकडून बंद असलेली गस्त पुन्हा सुरू करावी…

व्यापाऱ्यांची मागणी: पोलीस निरीक्षकांकडे केली निवेदनद्वारे मागणी..

⚡वैभववाडी ता.१५-: वैभववाडी शहरात काही महिन्यापूर्वी चोरट्याने काही दुकाने मेडिकल फोडली होती बऱ्याच दिवसानंतर पुन्हा वैभववाडी शहरात शनिवारी रात्री त्यांची पुनरावृत्ती दिसून आली बंद असलेल्या मेडिकल व बेकरी दुकानात चोरीचा प्रकार घडला या पार्श्वभूमीवर आज वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने वैभववाडी पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांची भेट घेऊन बाजारपेठेत पोलीस प्रशासनाकडून बंद असलेली गस्त पुन्हा सुरू करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर अरविंद गड सुरेंद्र नारकर नितेश पाटील संजय लोके वसंत पटेल बाळू शिरोडेकर आधी व्यापारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page