शेर्ले शेटकरवाडी येथे घरावर फणसाचे झाड कोसळल्याने तीन लाखांचे नुकसान…

बांदा/प्रतिनिधी
शेर्ले शेटकरवाडी येथील अनिता पालव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळल्याने पालव यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी घडली. ही माहिती शेर्लेचे माजी सरपंच उदय धुरी यांनी दिली.


बांदा परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेर्ले येथील पालव यांच्या घरानजीक असलेले भलेमोठे फणसाचे झाड पालव यांच्या घरावर कोसळले. यामध्ये घराच्या छपराचे तसेच व घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला केले. महसूल विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरु होते.

You cannot copy content of this page