हरवलेला मोबाईल बांदा पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात केला हस्तगत…

⚡बांदा ता.१५-: बांदा बसस्थानक परिसरातून येथील सिद्धेश रेडकर यांचा हरवलेला मोबाईल बांदा पोलिसांनी सीईआयआर या पोलिस यंत्रणेच्या पोर्टलमार्फत कारवाई करून अवघ्या एका महिन्यात हस्तगत केला. मुळ मालकाला मोबाईल परत देण्यात आला असून आतापर्यंत आठ जणांचे मोबाईल हस्तगत करून परत देण्यात आले आहेत.
रेडकर यांचे दुचाकी गॅरेज असून महिन्याभरपूर्वी बांदा बसस्थानक परिसरातून त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यांनी बांदा पोलिसात तक्रार दाखल केली होती. बांदा पोलिसानी अवघ्या काही दिवसांत तक्रार नोंदवल्यावर आपल्या पोलिस यंत्रणेचा वापर करून आरोपी पर्यंत पोहचून मोबाईल हस्तगत केला.
बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे आणि पोलिस हवालदार वेदिका गावडे यांच्या हस्ते सिद्धेश याला मोबाईल परत करण्यात आला. निरीक्षक श्री बडवे यांनी जनतेला आवाहन केले की, अशा घटना कोणतीही व्यक्ती सोबत घडल्यास पोलिस स्टेशनला येऊन आपली सविस्तर माहिती व कागद पत्रे जमा करून तक्रार नोंदविल्यास आपला मोबाईल सापडू शकतो. तसेच हवालदार वेदिका गावडे यांनी सांगितले की आत्तापर्यंत मोबाईल चोरीच्या १७ तक्रारी बांदा पोलिस ठाण्यात नोंद आहेत. त्यातील आठ जणांचे मोबाईल सीईआयआर पोर्टलच्या अंतर्गत कारवाई करून मिळवून देण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page