रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाच्या अध्यक्षपदी अवधूत चिंदरकर यांची निवड…

⚡बांदा ता.१५-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाच्या अध्यक्षपदी अवधूत चिंदरकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात पार पडणार असल्याची माहीत मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी दिली आहे.
सचिव पदी मिताली सावंत, सहसचिव पदी ईश्वरी कल्याणकर व खजिनदारपदी शिवम गावडे यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी संकेत वेंगुर्लेकर, अजिंक्य पावसकर, अक्षय कोकाटे, अमित धोंगडे, दत्तराज चिंदरकर, ओंकार पावसकर, निहाल गवंडे, रोहन कुबडे, शंकर कोकाटे, कल्याणदास धुरी, अक्षय गवस, विनिता कुबडे, रुपाली देसाई आदी उपस्थित होते.
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाने गेल्या दीड वर्षात रोटरी क्लब ऑफ बांदा च्या सहकार्याने ५० हून अधिक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रात काम केले आहे. भविष्यात सुद्धा नवीन नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून जोमाने काम करून विविध उपक्रम राबविण्यात येतील असे यावेळी मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी सांगितले.
फोटो :-
पासपोर्ट.

You cannot copy content of this page