⚡मालवण ता.१३-: एसएसपीएम लाईफटाइम हॉस्पिटल पडवे आणि तळगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर सोमवार दि. १५ जुलै रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, डोळे, युरोलॉजी, अस्थीरोग, जनरल सर्जरी, कर्करोग, दंतरोग, नेफ्रोलॉजी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी जगदीश चव्हाण ८९९९७९९३७२ यांच्याशी संपर्क साधावा, गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तळगाव येथे १५ रोजी आरोग्य तपासणी शिबीर…
