Headlines

मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या कॉम्प्युटर केबिनचे संतोष गायके यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन…

⚡सावंतवाडी ता.१३सहदेव राऊळ-: शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या कॉम्प्युटर केबिनचे उदघाटन आज पुणे येथील श्री गणेश पॅकेजिंगचे मालक संतोष गायके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.


शारदा विद्यालय मळगाव शाळेस पुणे येथील श्री गणेश पॅकेजिंगचे मालक संतोष गायके यांनी प्रदान केलेल्या ५१, १५१ च्या देणगीतून या कॉम्प्युटर केबिन उभारणीचे काम पूर्णत्वास आले. या केबिनचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत गायके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योगेश होल, केतन नार्वेकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, श्रावणी सावंत, केंद्रप्रमुख शिवाजी गावीत , सदस्य सिद्धेश तेंडोलकर, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, सौ. जाधव, सौ. वारंग, सौ. शिरोडकर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. मळगाव येथील या प्रशालेचे माजी विद्यार्थी केतन नार्वेकर (सद्या कामानिमित्त पुणे येथे स्थायिक असलेले ) यांनी यासाठी विशेष पाठपुरावा केला. पूर्णत्वास आलेल्या या सुसज्ज, आकर्षक कॉम्प्युटर केबिनचा उपभोग मुलांना होऊन त्यांच्या ज्ञानात आता अधिकच भर पडणार आहे, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. शाळेस केलेल्या या दातृत्वाबद्दल संतोष जायके यांचे व यासाठी विशेष पाठपुरावा केलेल्या केतन नार्वेकर यांचे मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष विवेक नार्वेकर यांनी विशेष आभार व्यक्त केले. यावेळी गायके यांनी शाळेच्या सर्व वर्ग खोल्यांची पाहणी केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून तसेच देणगीदारांकडून शाळेसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची विवेक नार्वेकर यांनी त्यांना माहिती करून दिली. अशाच प्रकारे शाळेसाठी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही यावेळी शाळेच्यावतीने करण्यात आले.

You cannot copy content of this page