अभिनेते संतोष जुवेकर, निर्माते महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
*💫सावंतवाडी दि.०३-:* शहरात नव्याने सुरू होत असलेल्या “५० शेड्स” या कॅफेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते संतोष जुवेकर आणि मराठी चित्रपट निर्माते महेश पाटील या दोघांच्या हस्ते “५० शेड्स” या कॅफेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी ढोलताशा चा गजरात शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी ५० शेट्स चे मालक श्री. कुणाल चोडणकर व कुटुंबीय ,मित्रपरिवार उपस्थित होते.
