बांदा कट्टा कॉर्नर येथे मातीच्या भरावात ट्रक रुतून अपघातग्रस्त

⚡बांदा ता.१३-: गोव्यातून आंबोलीच्या दिशेने लोखंड वाहतूक करणारा ट्रॅक बांदा महामार्गावार कट्टा कॉर्नर येथे मातीच्या भरावात रुतून अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. हा अपघात आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास झाला.
याठिकाणी उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून पुलाखालील रस्त्यांची कामे करण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात आला आहे. वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने अवजड वाहने मातीत रुतण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. आज सकाळीच ट्रॅक रुतल्याने वाहतूक विस्कळीत झाली. क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

You cannot copy content of this page