अध्यक्ष प्रशांत गुळेकर, सचिव सचिन रावराणे तर खजिनदारपदी श्रेया धावले..
वैभववाडी प्रतिनिधी
रोटरी क्लब वैभववाडीच्या अध्यक्षपदी प्रशांत गुळेकर सचिव पदी सचिन रावराणे तर खजिनदारपदी श्रीमती श्रेया धावले यांची निवड करण्यात आली नवीन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा दिनांक 14 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता महाराणा प्रताप जीवन विकास केंद्र आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हॉलमध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती रोटरी क्लबच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष संजय रावराणे, संतोष टक्के, नूतन अध्यक्ष प्रशांत गुळेकर, सचिन रावराणे, श्रेया धावले मुकुंदराव राणेआदी उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष संजय रावराणे यांनी वर्षभरात आपल्या अध्यक्षपदाच्या काळात रोटरीतर्फे राबविण्यात गेलेल्या उपक्रमांची माहिती दिली रोटरी क्लब तर्फे वैभववाडीत रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू अंध व अपंग मुलांना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप उत्तम समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार पाक कला फुगडी रशिकखेश निबंध वकृत्व चित्रकला आधी स्पर्धेचे आयोजन रोटरी महोत्सव रानभाज्या महोत्सव भरड धान्य प्रदर्शन आणि वृक्ष लागवड महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण आरोग्य विषयक मार्गदर्शन आधी वर्षभरात कामे करण्यात आलेची माहिती देण्यात आली.
