⚡कुडाळ ता.११-: नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आनंददायी शनिवार ही संकल्पना शिक्षण विभागाने पुढे आणली त्या अंतर्गत येत्या शनिवार दि. १३ जुलै रोजी पाट हायस्कुलमध्ये अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभ्यासिकेसाठी ऋणानुबंध संघटनेतर्फे पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
पाट हायस्कूल आणि एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात. कै मा एकनाथजी ठाकूर कला अकादमी तर्फे कलाविषयक विविध उपक्रम घेतले जातात. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आनंददायी शनिवार ही संकल्पना शिक्षण विभागाने पुढे आणली पाठास्कूलमध्ये या शनिवारी महाराष्ट्राचा शाहीर चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन मोरे आणि या चित्रपटातील अभिनेता पाट हायस्कूलचा माजी विद्यार्थी निलेश परब भूषण तांडेलआणि ऋणानुबंध संघटनेतर्फे अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यावेळी अभ्यासिकेसाठी ऋणानुबंध संघटनेतर्फे पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तके यावेळी भेट म्हणून विद्यालयात दिली जाणार आहेत. या उपक्रमांचा मुलांनाही चांगला लाभ होत आहे. यामध्ये मुलानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कला शिक्षक संदीप साळसकर यांनी केले आहे.
