विशाल परब:नेमळे शाळेतील विद्यार्थ्यांना रविंद्र चव्हाण,नारायण राणें यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्यांचे केले वाटप..
⚡सावंतवाडी ता.१०-: “प्रगतीची वाट शिक्षणातून जाते. भाजपाच्या कोकणातील सर्व नेत्यांना इथल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवरील आर्थिक संघर्षाची कल्पना आहे. आपले नेते रविंद्रजी चव्हाण, नारायणराव राणे यांची आजची यशस्वी वाटचाल ही कधीकाळी अशाच संघर्षातून झालेली आहे. मी स्वत:देखील या परिस्थितीतून गेलो असल्याने रविंद्रजी चव्हाण आणि नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दप्तर वाटपाचा कार्यक्रम राबवत आहे. असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे केले.दरम्यान नेमळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना भाजप नेते रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे यांच्या सौजन्याने विशाल परब यांच्या पुढाकारातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या व्यवस्थापकांकडून श्री परब यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिक्षक व पालकवर्गाने यावेळी विशाल परब यांच्या या गरजेच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि मोठे होऊन आमचे विद्यार्थीही भाजपाच्या या समाजसेवेचा वारसा निश्चितपणे पुढे चालवतील असा शब्द विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत, सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटात दिला.
यावेळी नेमळेचे माजी सरपंच श्री.विनोद राऊळ, ॲड अनिल निरवडेकर, गाव प्रमुख मनोहर राउळ, बुथ अध्यक्ष सुनील राऊळ, प्रविण वेंगुर्लेकर, भास्कर राऊळ, नंदकुमार देवळी, प्रकाश नेमळेकर, शशिकांत नाईक, समीर नेमळेकर, रोहित राऊळ,साई नाईक, ग्रा.प. सदस्या गौरवी कुणकेरकर, सुहास पिकुळकर, गुरुनाथ पिकुळकर, साक्षी राऊळ, विनित राऊळ, मुख्याध्यापक श्री विठ्ठल तुळसकर, शक्ती केंद्र प्रमुख
गौरव मुळीक, महिला गाव अध्यक्षा तन्वी राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
