सावंतवाडी रेल्वे स्थानकाला केवळ बाहेरून रंगरंगोटी…

रुपेश राऊळ: टर्मिनस दर्जा, रेल्वे गाड्यांना थांबा का नाही..? पालकमंत्र्यांनी लक्ष घालावा..

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी रेल्वे स्थानकाची केवळ बाहेरून रंगरंगोटी आणि आतून पोकळ अशी अवस्था असून, सावंतवाडीत रेल्वे स्थानकाला सावंतवाडी टर्मिनस चा दर्जा मिळूनही अद्यापही इथे अनेक रेल्वे गाड्यांना थांबा का दिला जात नाही असा सवाल ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस चा दर्जा मिळाला आहे. परंतु, अद्याप येथे अनेक रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात नाही आहे. तसेच प्रवाशांसाठी येथे वेटींग रूम देखील उपलब्ध नसून, प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देखील उपलब्ध नाही आहेत. सावंतवाडी येथून सुटणारी तुतारी ही गाडी देखील प्लॅटफॉर्म 2 वर लागत असल्याने वयोवृध्द प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घालून या सर्व समस्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावे त असे ही श्री राऊळ यावेळी बोलताना म्हणाले

You cannot copy content of this page