बाळा गावडे:रेल्वे प्रवाशांच्या त्रासाला केसरकर जबाबदार..
⚡सावंतवाडी ता.१०-: रेल्वे टर्मिनस सुरू झाला असत तर सावंतवाडी टर्मिनस पर्यंत येऊन परत मुंबईच्या दिशेने गाड्या धाऊ शकल्या असत्या आता मात्र त्या गाड्या धाऊ शकत नाहीत आणि बऱ्याच गाड्यांना थांबा मिळत नाही. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला केसरकरच जबाबदार आहेत असा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी केला आहे.
दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेतून निधी रेल हॉटेल टर्मिनस साठी जाहीर केलेला पण तो निधी सुद्धा का दिला नाही? म्हणजे विकासाची फक्त वल्गना करणारे मंत्री दीपक केसरकरांमुळेच आज रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्यात यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत अशी टीका ही श्री गावडे यांनी केली
