रूपेश राऊळ: निवडणुकीच्या तोंडावर केसरकरांच्या आश्वासनाच्या खैरात
⚡सावंतवाडी ता.१०-: पंधरा वर्षे आमदार व मंत्री होऊन सुद्धा तालुक्यातील पंचायत समितीची इमारत उभारू शकले नाही, हे केसरकरांच दुर्दैव आहे, अशी टीका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केली.
दरम्यान निवडणुका जवळ आल्याने मंत्री केसरकर यांच्या मोठमोठ्या घोषणा सुरु झाल्या आहेत. परंतु त्यांच्या घोषणा केवळ पोकळ आश्वासने आहेत, अशी टीकाही श्री.राऊळ यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शैलेश गवंढळकर, शब्बीर मणियार, कौस्तुभ गावडे, आदी उपस्थित होते
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्थापना एक मे 19 81 मध्ये झाली त्यावेळी भाईसाहेब सावंत पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्याचा ज्या पद्धतीने विकास केला तो विकास आजपर्यंतच्या कुठल्या मंत्र्याला करता आला नाही ते सपसेल पालकमंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. भाईसाहेब सावंत यांच्या योगदानाला प्रेरित होऊन आतापर्यंत होऊन गेलेल्या पालकमंत्र्यांनी दुर्ग जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जायला हवे होते परंतु त्यांच्याकडून ते झाले नाही. अनेक आमदार दीपक केसरकर यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री पद भोगले परंतु त्यांच्याकडून जनतेची निराशा झाली पंधरा वर्षे आमदार व मंत्री असूनही ते सावंतवाडी तालुक्याची पंचायत समिती इमारत उभारू शकले नाही केवळ पोकळ आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही त्यांच्या याच आश्वासनामुळे पंचायत समितीचा कारभार जिल्हा परिषदेच्या गोडाऊनमध्ये अजूनही सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेचे दुर्दैव आहे. मुळात 2021 मध्ये या पंचायत समितीच्या इमारतीचा आराखडा दोन कोटीचा असताना तो आज 16 कोटी वर गेला आहे याला जबाबदारही केसरकरचआहेत. केवळ पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी यश न मिळाल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला आहे आता निवडणूक जवळ आल्याने पुन्हा एकदा ते घोषणांचा पाऊस पडत आहेत परंतु त्यांच्या घोषणांना येथील जनतेने बळी पडू नये त्यांच्या घोषणा या पोकळच राहणार आहे.
श्री राऊळ पुढे म्हणाले, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस च्या बाबतीतही केसरकर पैसे ठरले आहेत मुळात मडुरा की मळगाव अशा भांडणामध्ये या स्थानकाचा विकास कुठला गेला त्यानंतर टर्मिनसचा दर्जा मिळूनही पुढे त्याचा विकास न झाल्याने केवळ टर्मिनल असून नसल्यासारखे आहे या ठिकाणी रेल्वेने थांबा मिळत नाही वेटिंग रूम व्यवस्थित नाहीत या सर्व गोष्टींना केसरकरच जबाबदार आहेत.
