बाळु सावंत यांची मागणी:कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून निवेदन केले सादर..
⚡बांदा ता.१०-: बांदा-वाफोली रस्त्यावर गवळीटेम्ब येथे सुरु झालेल्या नवीन खासगी कंपनीत स्थानिक कुशल व अंकुशल युवकांना नोकरीत सामावून घ्यावी अशी मागणी बांदा ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे.
याठिकाणी कार्यरत असलेल्या पै काणे कंपनीच्या आवारात दुसरी खासगी कंपनी नुकतीच सुरु करण्यात आली आहे. या कंपनीला मनुष्यबळाची गरज असून या कंपनीत नोकरीसाठी जास्तीत जास्त स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी रीतसर निवेदन देखील देण्यात आले.
कंपनी व्यवस्थापनाने कंपनी ही बांदा गावात सुरु करण्यात आली असून शैक्षणिक पात्रतेनुसार अधिकाधिक स्थानिकानाच प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, रत्नाकर आगलावे, साईप्रसाद काणेकर, आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, सौ. रुपाली शिरसाट, सौ रेश्मा सावंत, सौ. शिल्पा परब यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
