आपल्या शाळेबद्दल मनात आस्था बाळगा…

उद्योजक डॉ. दीपक परब  यांचे प्रतिपादन:बागवे हायस्कुल मसूरे येथे बक्षीस वितरण समारंभ…  

⚡मालवण ता ०९-: जीवनात शिक्षण महत्वाचे आहे. विध्यार्थ्यानी साहित्य जास्त वाचावे.शाळेच्या व जिल्ह्यातील मुलांना सुद्धा आज बक्षीस वितरण झाले ही अभिमानाची बाब आहे. अभ्यासातील गणित मला जमलं नाही पण व्यवसायचं गणित चांगलं  जमल्यामुळे तुमच्या समोर उभा आहे. विध्यार्थी आणि शिक्षक यांच्या एकत्रित मेहनतिमुळे शाळेचा चांगला निकाल येत आहे. मुलांनी  मनातून न्यून गंड काढून टाकावा.ज्या शाळेमुळे मी घडलो ती शाळा माझी आहे अशी आठवण ठेवा. असे प्रतिपादन मसूरे एज्यूकेशन सोसायटी अध्यक्ष  उद्योजक डॉ. दीपक परब यांनी मसूरे येथे केले.                    

आर. पी. बागवे हायस्कुल आणि तांत्रिक विद्यालय मसूरे येथे प्रशालेतील, जिल्ह्यातील गुणवंत विध्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी जी प अध्यक्ष सौ सरोज परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे, उद्योजका सौ राधिका परब, दिपलक्ष्मी पेडणेकर, कृषी रत्न मिलिंद प्रभू, डॉ. सुधीर मेहेंदळे, रमेश परब, पंढरीनाथ नाचणकर, दतप्रसाद पेडणेकर, बाळू परब,  पंढरीनाथ मसूरकर, भाऊ बागवे, अप्पा परब, सुरेश चव्हाण, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते. 

यावेळी आशिष पेडणेकर ,सौ सरोज परब ,लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे यांची समयोचित भाषणे झाली

यावेळी  आदर्श विध्यार्थी प्रशांत सांडव व आदर्श कर्मचारी म्हणून लिपिक दयानंद पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहा. शिक्षक रमेश पाताडे, सुनील बांदेकर,  शशांक पिंगुळकर, एन. एस. जाधव, श्री घाटे, भरत ठाकूर, श्री कांबळे, श्री चौगले, सौ मसूरेकर, सौ सोनाली कोदे, विशाखा जाधव, सौ. आर्या भोगले, समीर नाईक, दयानंद पेडणेकर, भानुदास परब, अनिल मेस्त्री, चरणदास फुकट, श्री हळवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सौ अर्चना कोदे तर आभार श्री कांबळे यांनी मानले.

You cannot copy content of this page