चालक जखमी;जिल्हा वाहतूक पोलिसांसह कणकवली पोलिसांची घटनास्थळी धाव
*💫कणकवली दि ०३-:* :मुंबईहून गोव्याच्या दिशेने चॉकलेट घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कणकवली- जानवली रतांबी चा व्हाळ येथे टेम्पो महामार्गावर पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात टेम्पो चालक राकेश पुजारा सिंग ( वय 24, रा.मुंबई ) हा जखमी झाला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.शनिवारी सकाळी झालेल्या अपघातातील टेम्पोचालक राकेश पुजारा सिंग याला व त्याच्या सहकाऱ्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चालक राकेश याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.अपघातात टेम्पो चे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश गवस व सुनील निकम यांच्यासह कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली .जखमीना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
