राजन तेलींकडून पाहणी: ग्रामस्थांना दिला धीर..
⚡वेंगुर्ला ता.०९-: दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आरवली गावात पूर परिस्थिती आली असून या परिस्थितीची पाहणी आज माजी आमदार तथा भाजप व विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी करून आढावा घेत प्रशासनामार्फत काय उपायोजना करता येतील याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली.
याप्रसंगी वेंगुर्ला तहसिलदार श्री. ओमकार ओतारी, नायब तहसिलदार श्री. अभिजीत हजारे, आरवली सरपंच श्री. समीर कांबळी, ग्रामपंचायत सदस्य सौ. रश्मी डिचोलकर, शिरोडा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. रमाकांत सावंत, माजी सरपंच श्री. मनोज उगवेकर, माजगाव शक्ती केंद्रप्रमुख श्री. अजय सावंत, खार लाईन विभागाचे श्री. जय पाटील, शिरोडा शक्ती केंद्रप्रमुख श्री. महादेव नाईक, भाजप तालुका उपाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत कर्पे, श्री. सुधीर नार्वेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
