जयेंद्र परूळेकर यांचा सवाल:अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेले नुकसान बद्दल दोघांना सोयरसुतक नसल्याची केली टीका..
⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीची दावेदारी मांडणाऱ्या महायुतीच्याच दोन पक्षातील शिलेदारांकडे सदर मायनिंग प्रकल्पाविरोधात ठामपणे उभं राहण्याचे धाडस आहे का? असा सवाल ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी मंत्री केसरकर व माजी आमदार राजन तेली यांना केला आहे.
दरम्यान महायुती मध्ये उमेदवारीवरून मित्र पक्षांमध्ये धुमशान सुरू झालेलं आहे.एकमेकांच्या हकालपट्टीची भाषा करत आहे, परंतुकाल झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले त्या बद्दल कोणालाही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. अशी टीका देखील श्री परुळेकर यांनी यावेळी केली.
