भाजपच्या बैठकीत एकमुखी ठराव; संजू परब यांची माहिती..
⚡सावंतवाडी ता.०९-: आगामी विधानसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी मिळो परंतु तो भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हवा असा एकमुखी ठराव आज भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती संजू परब यांनी दिली.दरम्यान आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक सावंतवाडीत पार पडली.
यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी नाता नाडकर्णी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गोंवढळकर, पप्पू परब, रवी मडगावकर,प्रमोद गावडे,बांदा मंडलअध्यक्ष महेश धुरी, महेश सारंग, संजू परब, मनोज नाईक, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, प्रमोद गावडे,सचिन साटेलकर, , राजू परब, पंकज पेडणेकर, हनुमंत पेंडणेकर सत्यवान बांदेकर, मधु देसाई आदी उपस्थित होते.
