सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान…

भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून तत्काळ अर्थीक मदत सुपूर्द…

⚡सावंतवाडी ता.०९-: गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक गावात याचा फटका बसला आहे. सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच्या घराची भिंत कोसळुन नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घोगळे कुटुंबियांसाठी मदत पाठवून दिली.

यावेळी महिला मोर्चा प्रदेश कार्य.सदस्य दिपलक्ष्मी पडते, मंडल अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस देवेंद्र सामंत, शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब, बूथ कमिटी अध्यक्ष सुधीर धुरी, ग्रा.प सदस्य समीर धुरी, प्रमोद धुरी, कैलास यादव, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page