अंडरग्राउंड केबल मुळे शहरातील पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या…

सुरेश भोगटे: संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करा; नगरपालिकेकडे केली मागणी..

सावंतवाडी ता.०५-: शहरामत अंडरग्राउंड नेटवर्क केबल घालण्याचं काम चालू असल्याने अनेक भागात पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत, त्यामुळे नळधारकांना पाण्यापासून वंचित राहावं लागत असल्याने संबधितावर केबल टाकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करा ,अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी नगर परिषदेकडे केली आहे.


तर सावंतवाडी नगरपालिकेला विश्वासात न घेता सुरु असलेले केबल च काम चालू आहे ते शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याने ते तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
श्री भोगटे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध दिले आहे त्यात असे म्हटले की, सावंतवाडी शहरवासीयांसाठी असलेली पाण्याची लाईन ही पूर्वीपासून अंडरग्राउंड असून रोडच्या खालून आहे सध्या जे अंडरग्राउंड ड्रिलिंग करून केबल टाकण्याचं काम चालू आहे त्याबाबत नगरपरिषदेला कोणतीही कल्पना नाही सार्वजनिक बांधकाम कडून परवानगी घेऊन ड्रिलिंग करून पाईप टाकण्याचे काम चालू आहे. शहरांमध्ये ड्रिलिंग करत असताना यांच्याकडून अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटत असून नागरिकांना चार-चार दिवस पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळे तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी.
शहरातील दत्तनगर परिसरामध्ये शेकडो घरांना गेले चार दिवस पाणी मिळालं नसून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून सुरू असलेले हे काम तात्काळ थांबून नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली आहे

You cannot copy content of this page