गोवा आरटीओ कडून सिंधुदुर्गातील वाहन चालकांकडून होणारी लूट थांबवा…

राजन तेली: मुख्यमंत्र्यांची भेट घेत वेधले लक्ष..

⚡सावंतवाडी ता.०५-:
गोव्यात परमिटच्या गाड्या चालवल आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांना गोवा आरटीओ कडून नाहक दंड आकारला जात आहे याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेत दिलासा देण्याबाबत मागणी केली.

सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध लक्षात घेता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुण-तरुणी गोव्या राज्यात नोकरी धंद्यासाठी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वाहन चालक परमिटच्या गाड्या चालवल आपला उदरनिर्वाह करत आहेत परंतु त्यांच्या गाडीचा परवाना हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असल्याने गोवा आरटीओकडून त्यांना दंड आकारला जात आहे यामुळे वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गेले कित्येक महिने हा प्रकार सुरू असल्याने वाहनचालकातून नाराजी व्यक्त होत आहे याबाबत वेळोवेळी स्थानिक नेत्यांचे लक्ष वेधूनही काहीच हालचाली आल्या नाहीत याबाबत वाहन चालकांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचे लक्ष वेधले श्री तेली यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत याबाबत लक्षवेधक सिंधुदुर्गातील वाहन चालकांना आरटीओ कडून होणाऱ्या त्रासातून दिलासा देण्यात यावा अशी मागणी केली मुख्यमंत्री डॉ सावंत यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवली यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, शेखर गावकर, प्रीतेश राऊळ , संजय सातार्डेकर,युवामोर्चा दोडामार्ग मंडळ अध्यक्ष पराशर सावंत,देवेंद्र शेटकर उपस्थित होते

You cannot copy content of this page