Headlines

घरा नजीकच्या पाण्याचा स्त्रोतावर बांधकाम…

कारीवडे येथील दत्ताराम गावडे यांचे उपोषण..

ओरोस ता.०३-:

कारिवडे ग्रामपंचायत इमारत घराला लागून अनधिकृत बांधकामामुळे नैसर्गिक पाण्याचा रत्रोताचा आपल्या घराला बाधा येऊन कौटुंबिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नी लक्ष द्यावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर दत्ताराम विष्णू गावडे (रा. कारिवडे पेडवेवाडी) यानी उपोषण करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.


सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे पेडवेवाडी येथील दताराम विष्णू गावडे यांच्या राहते घर क्रमांक ९०६ याच्या लगत धर्माजी नारायण गावडे यांच्या अनधिकृत बांधकाम सुरू आहे. दत्ताराम गावडे यांच्या घराच्या पश्चिम बाजूने परंपरागत नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असून पावसाळ्यामध्ये सदरचा स्त्रोत पूर्णपणे प्रवाहित होतो. याबाबत कारिवडे ग्रामपंचायतकडे अर्ज दिला असून धर्माजी गावडे हे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाच्या वाटेवर खोदकाम करीत असताना नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होईल. अशा पद्धतीने खोदकाम करून घरापासून ग्रामपंचायत महसूल अधिनियम प्रमाणे अंतर न सोडता बांधकाम सुरू केले आहे. घराचे बांधकाम सुरू करण्याआधी त्यांनी नियमाप्रमाणे बांधकाम करणार असल्याचे कबूल केले असल्याचेही दत्तराम गावडे यांनी स्पष्ट केले. परंतु याची दखल न घेतल्यामुळे बांधकामामुळे होणारा अडथळा मार्गदर्शक सूचना देऊनही अनधिकृत बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यात यामुळे आपल्या घराला निर्माण होणारा धोका विचारात घेऊन याबाबत दखल घ्यावी यासाठी तहसील कार्यालय स्तरावर उपोषण केले होते. परंतु पंचायती कडूनही कोणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही दखल न घेतल्याने आपण जिल्हा परिषदेसमोर आज उपोषण करत असल्याचे दत्तराम विष्णू गावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page