घराजवळील पाण्याची, सांड पाण्याची पाईप लाईन कापली…

वृद्ध महिला दिपाली आईर यांचे उपोषण सुरू..

ओरोस ता.०३-:

घर परिसरात कंपाउंड मधील पिण्याचे पाण्याचीवायर कापून टाकली व सांडपाण्याचा पाईप टाकल्याप्रकरणी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज करून दखल घेतली गेली नाही त्यामुळे वयोवृद्ध, अपंग असलेल्या दिपाली भिकाजी आईर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
देवगड तालुक्यातील मावळुंगे देवळेकरवाडी येथील दिपाली भिकाजी आहेर यांनी न्याय प्रश्नाबाबत २६ जानेवारी रोजी उपोषण केले होते. परंतु अजूनही कोणताही न्याय मिळाला नाही. वारंवार याबाबत तक्रारी केल्या. त्या एका डोळ्याच्या उपचारासाठी मुंबईला गेल्या असता घराच्या कंपाउंड मधील सांडपाण्याचा पाईप तसेच पिण्याच्या पाण्याची वायर कापून टाकली गेली. याबाबत सरपंच आपल्या पदाचा गैरवापर करून अशा प्रकारचे निर्णय घेऊन माझ्या सारख्या अंध अपंग वयाने 64 वर्षे ओलांडलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारचा अन्याय का करतात ? असा प्रश्न करीत आईर यांनी विजयदुर्ग पोलीस अधिकारी यांनाही वेळोवेळी निवेदने दिली. परंतु अशा व्यक्तींसमोर कायद्याचा धाक नाही. त्यामुळे आम्हाला सरपंचांकडून त्रास होत आहे. आपण बीपी, ब्लड प्रेशरने ग्रासले असून आपल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

You cannot copy content of this page