सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी..
⚡मालवण ता.०२-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या विविध समस्या प्रशासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे या समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग स्थापनेचे अधिकृत पत्र व मागण्यांचे निवेदन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आले. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (सामान्य प्रशासन), (ग्रामपंचायत विभाग), मुख्यलेखा वित्त विभाग अधिकारी, प्रकल्प संचालक जि.ग्रा. विकास यंत्रणा यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश राणे, उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश राणे, कोषाध्यक्ष राजाराम जाधव, पदाधिकारी अंकुश मुणगेकर, भास्कर केरवडेकर, विठ्ठल वाटवे,नाऊ बेडेकर, रामा ठाकुर, दिपक मर्गज, हरमलकर, शिरसाट संजय गावडे, ए.व्ही.साटम, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सांघिक प्रयत्न करण्यासाठी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाची स्थापना झाली आहे. त्याला सहायक संस्था निबंधक सिंधुदुर्ग यांची अधिकृत कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे. या सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
