मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भाजपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार..

मोहिनी मडगावकर:सावंतवाडी शहरहसह ग्रामीण भागातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा..

⚡सावंतवाडी ता.०२-: महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत महिलांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा सर्व महिलांनी सावंतवाडीशहर ग्रामीण भागातील सर्व महिलांनी घ्यावा भाजप तर्फे या योजनेचे अर्ज सावंतवाडी शहरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन भाजप प्रदेश सदस्य व सावंतवाडी महिला मंडळ अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. ही योजना 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला विधवा विवाहित परितकत्या महिला याचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी महाराष्ट्रात असल्याचा रहिवासी अधिवास सर्टिफिकेट, अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असावे, सदर महिलेचे बँकेत खाते असावे, रेशन कार्ड मध्ये महिलेचं नाव असावे, तसेच लागणारे कागदपत्र उत्पन्नाचा दाखला सन 2025 पर्यंत वैद्य असावा, जन्माचा दाखला किंवा टीसी झेरॉक्स किंवा डोमेसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड व फोटो हे सगळं जमा करून तो ऑनलाइन फॉर्म भरावा. ही योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवली जात आहे. 15 जुलै पर्यंत अर्ज भरायची शेवटची तारीख आहे.. ऑगस्ट महिन्यापासून लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.. तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं महिला मोर्चा सावंतवाडी कडून आवाहन करण्यात आले आहे. आणि काही माहिती हवी असेल तर भाजप कार्यालय येथे संपर्क साधावा किंवा खासदार तथा संजू परबऑफिस इथे संपर्क साधावा अशी माहिती महिला मोर्चा सावंतवाडी भाजपा कडून करण्यात आली आहे. यावेळी साक्षी गवस मेघना साळगावकर सुकन्या टोपले आदी उपस्थित होते

सावंतवाडी पत्रकारांशी बोलताना मोहिनी मडगावकर बाजूला साक्षी गवस मेघना सागावकर सुकन्या टोपल

You cannot copy content of this page