विशाल परब यांच्या माध्यमातून बांदा शहरात फळ, फुले व भाज्या विक्रेत्यांना केले छत्र्यांचे वाटप…

⚡बांदा ता.०२-: भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून तसेच बांदा शहर भाजपा यांच्या सहकार्यातून बांदा येथील फळ, फुले व भाज्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आज छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आपल्याला छत्र्या मिळाल्यामुळे उपस्थित विक्रेत्यांनी श्री परब यांचे आभार मानले. परब यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बाजारपेठेतील विक्रेत्यांना छत्र्या वाटप करण्याचे काम सुरू आहे. आज ही मोहीम बांदा येथे राबविण्यात आली. यावेळी श्री परब यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे ग्रामस्थ व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी कौतुक केले.


यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अपेक्षा नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, श्यामसुंदर मांजरेकर, गुरुनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्या सौ. रेश्मा सावंत, माजी सरपंच गुरू धारगळकर, शैलेश केसरकर, मकरंद तोरसकर, निलेश कदम, साहिल कल्याणकर, गुरु कल्याणकर, ऋषी हरमलकर, विकी कदम, दिलीप बांदेकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :-
बांदा येथे विक्रेत्यांना छत्र्या वाटप करताना बांदा शहर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (छायाचित्र – निलेश मोरजकर)

You cannot copy content of this page