निरंजन डावखरेंच्या विजयाचा महायुतीतर्फे जल्लोष…

⚡वेंगुर्ला ता.०२-: कोकण मतदारसंघातून आमदार निरंजन डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक केली. त्यांच्या या विजयाबद्दल वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयासमोर महायुतीतर्फे भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डूबळे यांच्यासह पधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष केला.

  यावेळी भाजपाचे अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडीस, बाळू प्रभू, वसंत तांडेल, वृंदा गवंडळकर, सुजाता पडवळ, पप्पू परब, प्रणव वायंगणकर, सत्यविजय गावडे, कावेरी गावडे, समिर कांबळी, श्रेया मयेकर, आकांक्षा परब, स्नेहल पालकर, पल्लवी कांदे, प्रार्थना हळदणकर, रसिका मठकर, श्रद्धा धुरी, भूषण सारंग, पुंडलिक हळदणकर, विजय बागकर, नारायण गावडे, रविद्र शिरसाट, सत्यवान पालव, गुरूनाथ घाडी, दादा केळुसकर, मनोहर तांडेल, अनिकेत पेडणेकर, हितेश धुरी, समिर नाईक, बंटी गावडे, महादेव नाईक, रविद्र मुंडये यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
You cannot copy content of this page