धुरीवाडा येथील जोगी घरावरील धोकादायक माड केले बाजूला…

भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर व ग्रामस्थांचे सहकार्य..

मालवण दि प्रतिनिधी
मालवण धुरीवाडा येथील जोगी कुटुंबियांच्या घरावर असलेले तीन धोकादायक माड (नारळ झाड) भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांसह स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या माध्यमातून तोडून देत जोगी कुटुंबियांना दिलासा देण्यात आला आहे.

धुरीवाडा येथील जोगी कुटुंबीय यांच्या घरावर धोकदायक स्थितीत तीन माड होते. वाऱ्या पावसात हे माड कोसळण्याची भिती होती. याबाबत दीपक पाटकर यांना काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी माहिती देत काही करता येईल का विचारले. त्यावर दीपक पाटकर यांनी त्या कुटुंबियांना शब्द देत धोकादायक माड तोडून देण्याबाबत शब्द दिला होता तो आज पाळला गेला .याबाबत किरण जोगी, नीता जोगी, जिया जोगी, कुणाल मुंबरकर, लहू जोगी कुटुंबियांनी दीपक पाटकर यांसह भाजपा पदाधिकारी महेश सारंग, वसंत गांवकर, ललित चव्हाण, कृष्णा आडीवरेकर, राजु बिडये, आबा शिर्सेकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page