ॲड.सुभाष पणदुरकर ; रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार निर्णय…
⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक तब्बल 77 वर्षानंतर आता ठाणे जनता सहकारी बँकेत विधीनीकरण होणार आहे हे विलीनीकरण रिझर्व बँकेच्या सूचनेनुसारच करण्यात येत आहे रिझर्व बँकेने 30 दिवसाची मुदत आम्हाला दिली होती आणि त्यामुळेच आम्हाला हे विलीनीकरण करावे लागत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत चेअरमन एडवोकेट सुभाष पण दूरकर यांनी दिली.
तर यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या बँकेच्या हितासाठी आपण सात कोटी रुपये उभे करून दिले होते परंतु रिझर्व बँकेच्या नियमानुसार आता विलीनीकरण करावे लागत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री केसरकर पुढे म्हणाले हे विलीनीकरण व्हावे अशी कोणाचीच इच्छा नव्हती जर आम्हाला वेळ मिळाला असता तर आम्ही निश्चितपणे टार्गेट पुढेही केले असते शासनाकडे आम्ही अर्बन बँकेला फिक्स डिपॉझिट उभे करण्यासाठी अनुदान द्यावे असे मागणी होती परंतु आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही मात्र ज्या काही राज्यातील अर्बन बँक आहेत त्यांना काही देता येईल का या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत असेही ते म्हणाले.
