वराड येथील वरसकर विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप…

⚡मालवण ता.२९-: वराड बौद्धविकास मंडळ मुंबई व गावशाखा वराड यांच्यावतीने वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वितरीत करण्यात आल्या.

शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा ऊपक्रम राबविला असल्याचे मंडळाचे गावशाखा अध्यक्ष योगेश वराडकर यांनी सांगितले. तर शालेय समितीचे सदस्य, उद्योजक देवेन ढोलम यांनी मंडळाच्या या ऊपक्रमाचे कौतुक करत हा ऊपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शालेय समिती सदस्य देवेन ढोलम, मंडळाचे अध्यक्ष योगेश वराडकर, सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा नंदा संजय वराडकर, शाळेच्या मुख्याद्यापिका सौ. मयेकर, मंडळाचे सल्लागार संजय वराडकर, कोषाध्यक्ष अरविंद वराडकर, विराज वराडकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऊपस्थित होते.

बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा व मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण यावेळी करण्यात आला. तसेच जि. प. शाळा यामध्ये जि. प. शाळा वराड नं. १, जि. प. शाळा देऊळवाडी व जि. प. शाळा भंडारवाडी यामध्ये देखील वहया वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका मयेकर यांनी केले तर सुत्रसंचालन मुळीक यांनी केले.

You cannot copy content of this page