सुकळवाड येथे १ रोजी कृषी दिन कार्यक्रम

⚡मालवण ता.२९-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व ग्रामपंचायत सुकळवाड यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता श्री ब्राह्मणदेव सभागृह, सुकळवाड येथे कृषी दिन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी आत्मज मोरे, सहायक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, कृषी अधिकारी एकनाथ परब, सुकळवाड सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

You cannot copy content of this page