⚡कुडाळ ता.२८-: राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र आयोजित अमेरिकेच्या लेखिका व अंध दिव्यांग बांधवांच्या प्रेरणास्थान हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त छत्री वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर, क्रांती ट्रेडर्स मालक पवार, टेम्पो टूर्स ट्रॅव्हलर्सचे मालक बाबल पावसकर, लक्ष्मीनारायण पेट्रोल पंपमालक विशाल देसाई, शाम माजगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सचिव शेखर आळवे, खजिनदार नंदा सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक आणि अमित सामंत, पवार यांच्या माध्यमातून अंध बांधवांना छत्री वाटप आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सर्व अंध बांधवांनी आमदार वैभव नाईक व इतर दात्यांचे आभार मानले.
