छ. शाहू महाराज जन्म दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

वैभववाडी ता.२७
कोल्हापूर संस्थानचे अधिपती लोकराजा छ.शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन तसेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो.

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, पोलीस ठाणे वैभववाडी आणि नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी महाविद्यालय, दत्त मंदिर, संभाजी चौक ते वैभववाडी पोलीस ठाणे अशी भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली.
या रॅलीमध्ये आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे, वैभववाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.सुनिल अवसरमोल, नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग समन्वयक श्रीम.अर्पिता मुंबरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ.एम ए चौगुले, डॉ. एस सी राडे, प्रा.आर. ए. भोसले, प्रा.एस. एन.पाटील, डॉ.बी.डी.इंगवले, डॉ.आर.एम.गुलदे, प्रा.एस.एस.पाटील प्रा.निलेश कारेकर, विद्यार्थी व वैभववाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.या रॅलीमध्ये बाजारपेठेतील मुख्य मार्गाने धूम्रपान मद्यपान, आयुष्याची धुळधाण, करू नका व्यसनाची नशा, होईल आयुष्याची दुर्दशा अशा प्रकारच्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच सर्व नागरिकांनी व्यसनापासून दूर राहण्यासाठी बाजारपेठेतील संभाजी महाराज चौकात सामूहिक शपथ घेण्यात आली.

या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन वैभववाडी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वैभववाडी पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते.

You cannot copy content of this page