वैभववाडी ता.२७-: आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकिसरे जि. प. मतदार संघातील महिलांकरीता श्री बाळूमामा आदमापुर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आणि श्री विठ्ठल रखुमाई पंढरपूर दर्शन यात्रेकरीता मोफत बस सोडण्यात आल्या.
गुरुवारी सकाळी वैभववाडी येथून माजी सभापती अरविंद रावराणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, नगराध्यक्ष नेहा माईनकर, तालुका सोशल मिडियाप्रमुख बाबा कोकाटे, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी सभापती स्नेहलता चोरगे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
