⚡कुडाळ ता.२७-: पणदूर प्रशालेचे शिक्षक सचिन विजय चोरगे (वय ३७) रा. पणदूर यांचे आज पहाटे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. सचिन चोरगे हे गेली सहा वर्षे पणदूर प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त एसटी चालक विजय चोरगे यांचे ते थोरले मुलगे होत. त्यांच्या पश्चात आई, काका काकी, चुलत बहीण असा मोठा परिवार आहे. सचिन यांच्या जाण्याने पणदूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. पणदूर येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पणदूर प्रशालेचे शिक्षक सचिन चोरगे यांचे अल्पशा आजाराने निधन…
