काँग्रेसचे युवा नेते समीर वंजारी यांनी शिक्षणात रोवला मानाचा तुरा…

गांधी विचारधारा व दर्शन पदविकेत जिल्ह्यात दुसरा नंबर मिळविला

⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग काँग्रेसचे युवा नेते , जिल्हा सदस्य व वैश्य समाज पतसंस्था फोंडाघाट चे संचालक समीर वंजारी यांनी गांधी विचारधारा व दर्शन ही पदविका परीक्षेत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिक्षणात एक आणखीन ऐक मानाचा तुरा रौवला आहे.त्यांच्या या यशाबद्दल जिल्हास्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे.

दरम्यान आत्ताच झालेल्या गांधी विचारधारा व दर्शन या पदविका परीक्षेत श्री. समीर वंजारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 73% घेऊन घवघवीत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन करण्यात येत आहे.

यापूर्वी त्यांनी जर्नलिझम परीक्षेत जिल्ह्यात चौथ्या क्रमांकाने व ह्यूमन राइट्स जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांना या परीक्षेमध्ये बुवा सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले होते त्यांना या संदर्भात मनोगत विचारले असता सामाजिक व राजकीय काम करत असताना गांधी विचारधारासारखे अभ्यासक्रम महत्त्वाचे आहे असे वाटते. त्यामुळे विचारांचे राजकारण चांगल्या पद्धतीने करता येईल असे ते म्हणाले.

You cannot copy content of this page