⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर मतदारसंघासाठी सावंतवाडी तालुक्यात एकूण ७३.६८ टक्के मतदान झाले.
एकूण ४ हजार ३८४ मतदारांपैकी ३ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात
१८७६ पुरुष तर १३५४ महिला मतदारांनी मतदान केले.
तालुक्यातील एकुण सात मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६
वाजेपर्यंत अविरत पणे मतदान सुरु होते. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता.
मतदानासाठी सुट्टी दिलेली नसतानाही तसेच ने आण करण्याची कोणतीही व्यवस्था केलेली
नसतानाही शिक्षक तसेच अन्य मतदारही स्वतःच्या वाहनाने मतदान केंद्रापर्यंत पोहोचत होते.
एकंदरीतच तालुक्यात कुठेही कोणतेही गालबोट न लागता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी सावंतवाडी तालुक्यात एकूण सात मतदार
केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे पदवीधरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या
त्या भागातील मतदान केंद्रावर जाणे सुलभ आणि सोयीचे झाले होते. मात्र दिवसभर संततधार
पाऊस कोसळत असल्याने सकाळच्या सत्रात मतदान प्रक्रिया काहीशी संत गतीने सुरू होते.
दुपारनंतर काहीसा पाऊस ओसरल्यानंतर मतदानासाठी पदवीधरांची गर्दी पाहायला मिळाली.
तालुक्यात सावंतवाडी शहरात तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी तीन, सावंतवाडी जिल्हा
परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ अशी एकुण चार तर मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल व बांदा
येथे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल या ठिकाणी दोन अशी सात मतदार केंद्रांवर ही
निवडणूक प्रक्रिया पार पडली.
प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया
सुरळीत पार पाडण्यासाठी लक्ष ठेऊन होते. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर
पदवीधर मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजेरी लावली होती तर महायुती आणि
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्राबाहेर ठाण मांडला होता. महायुतीकडून
उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विजयासाठी योग्य नियोजन आणि रणनीती आखली होती.
गावातील प्रत्येक मतदारापर्यंत पदाधिकारी पोहोचले होते. मतदान कसे करावे त्याचीही ते
माहिती देत होते. त्यामुळे पदवीधरांना मतदान करताना कोणतीही अडचण आली नाही.
मात्र, महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडी कडून उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचाराबाबत
काहीच हालचाली दिसून आल्या नाहीत.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सावंतवाडी
तालुक्यातील मतदान केंद्रावर भेटी देत मतदानाचा आढावा घेतला. तसेच भाजपचे जिल्हा
उपाध्यक्ष संजू परब, आमदार राजन तेली यांनीही मतदानाचा आढावा घेत बुथना भेटी
दिल्या.
सावंतवाडीत भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा
बँक संचालक महेश सारंग, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, सुधीर आडिवरेकर, ॲड.
संजू शिरोडकर, दिनेश सारंग, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर ,मोहिनी मडगावकर,
रेश्मा सावंत, राजू बेग, आनंद नेवगी, संतोष गांवस, दिलीप भालेकर, संतोष
पालेकर, सचिन साटेलकर, सचिन बिर्जे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, उपसरपंच दत्तू
नार्वेकर, माजी सभापती राजू परब, मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच गणेश
प्रसाद पेडणेकर, निलेश कुडव, संदेश सोनुर्लेकर, बंटी पुरोहित, पुंडलिक कदम आदी
पदाधिकारी कार्यकर्ते पाहायला मिळत होते.
तर महाविकास आघाडीकडून विकास सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले,
राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,
ॲड. राघवेंद्र नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, संजय
लाड, ॲड. दिलीप नार्वेकर, समीर वंजारी, रविंद्र म्हापसेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते.
तर मळेवाड येथील मतदान केंद्राबाहेर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे,
मळेवाड ग्राम पंचायत सदस्य दादा परब, राजू गावडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव
संजय नाईक आदी भाजपा पदाधिकारी ठाण मांडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न
करीत होते.
सावंतवाडी तालुक्यात ७३.६८ टक्के मतदान…
