आरपीडी ’ प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती व स्व. नाम. भाईसाहेब सावंत पुण्यतिथी साजरी…

⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज सावंतवाडी प्रशालेत राजर्षी शाहू महाराज जयंती व स्व. नाम. भाईसाहेब सावंत पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील गरजू व होतकरू अशा १०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यापैकी काही गणवेश शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुखदा म्हापणकर , माजी विद्यार्थीनी शितल नाईक , श्री. दीपक गावडे तसेच श्री. सुनील नाईक यांनी पुरस्कृत केले होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज व स्व. नाम.भाईसाहेब सावंत यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.


याप्रसंगी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री श्री. प्रवीणभाई भोसले , शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकासभाई सावंत हे उपस्थित होते. तसेच यांच्यासमवेत संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत , गणवेश दाते श्री. दीनानाथ नाईक, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. सुखदा म्हापणकर तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड , उपमुख्याध्यापक श्री. पी.एम.सावंत , पर्यवेक्षक श्रीम संप्रवी कशाळीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्रीम संप्रवी कशाळीकर व सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीम शिरोडकर यांनी केले.

You cannot copy content of this page