⚡मालवण ता.२६-:
कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील. सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथे शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी प्रवेश घेतलेल्या इयत्ता ११वी च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव तसेच बारावी परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महाविद्यालयाच्या श्रीपाद भवन येथे संपन्न झाला.
बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत संस्था पदाधिकारी व प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित कृ.सि देसाई शिक्षण मंडळाचे पदाधिकारी श्री. संदेश कोयंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच ध्येय निश्चिती केली पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ .एम .आर. खोत, डॉ. डी. बी. हारगिले, डॉ.एच .एम. चौगुले, डॉ. एस. एस .नाईक, डॉ. यु.वाय सामंत, प्राध्यापक राबते, प्रा. खोबरे, कनिष्ठ महाविद्यालय प्रा. एम. एम सामंत, एच.वाय.धामापूरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एच. वाय. खान यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापिका ए.ए.कदम यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, संस्थेचे सचिव गणेश कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन प्रा. एस.सी बर्वे यांनी केले.
