गोवा महामार्गालगत फिट येऊन पडल्याने युवकाचे निधन

⚡बांदा ता.२५-: बांदा – देऊळवाडी येथील आपा भीमसेन चव्हाण (वय ३८) या युवकाचे मुंबई गोवा महामार्गालगत फिट येऊन पडल्याने निधन झाले. काल सायंकाळी उशिरा त्याला तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचे निधन झाले. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मागे आई, दोन भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page