⚡सावंतवाडी ता.२४-: कोकण पदवीधर मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. सर्व प्रभाग निहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ॲड. राघवेंद्र दिलीप नार्वेकर शहर अध्यक्ष सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटी, माजी तालुकाध्यक्ष रविन्द्र म्हापसेकर , बाळासाहेब नंदीहळी सर , प्रोफेसर समीर भात, संजय लाड, पुंडलिक दळवी तालुकाध्यक्ष सावंतवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस कमिटी, ॲड. कौस्तुभ गावडे युवासेना सावंतवाडी तालुकाप्रमुख, विशाल सावंत युवासेना शहरप्रमुख, काशिनाथ दुभाषी तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी, देवया टेमकर शहर अध्यक्ष सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी, आदी उपस्थित होते
यावेळी सावंतवाडी शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार राघवेंद्र नार्वेकर व पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केला.
