नारायण राणेंचा विश्वास सार्थकी लावणार…

आडवली-मालडी मतदार संघाला न्याय देणार;सभापतीं महेंद्र चव्हाण यांचे श्रावण येथे प्रतिपादन

*💫मालवण, दि.३१-:* जनतेने टाकलेल्या विश्वासामुळेच आपल्याला हे पद मिळाले असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अपेक्षित विकास साध्य करताना या मतदार संघाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी आज श्रावण येथे केले. महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर १ या प्रशालेच्यावतीने जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत उपसभापती राजू परूळेकर, बाळू कुबल, श्रावण सरपंच प्रशांत परब व ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा हर्णे, शिवराम परब शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते. येथील जनतेने आपल्याला निवडून दिले. त्यामुळेच आज या पदापर्यंत पोहचू शकलो. या मतदार संघाचा विकास करताना सर्वांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी राजू परुळेकर यांनीही आपले विचार मांडले.

You cannot copy content of this page