*💫बांदा दि.३१-:* एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत राबविण्यात येणारा पोषण आहार पंधरवडा बांदा गावातील अंगणवाड्यामध्ये १६ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत यशस्वीपणे राबविण्यात आला. या पंधरवड्याच्या निमित्ताने ३० मार्च रोजी बांदा बीटच्या मुख्य सेविका सिंधु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा निमजगा येथील अंगणवाडीत पोषण आहार पंधरवडा घेण्यात आला. यावेळी बांदा गावातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. या पंधरवडयाच्या अभियानात लाभार्थी किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटातील मुले या सर्व लाभार्थ्यांनी पूरक आहार कसा व कोणत्या प्रकारचा घ्यावा व तो कसा बनवावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या दिवशी किशोरवयीन मुलींसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व लाभार्थ्यांना आहार आरोग्य व स्वच्छता याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, गीतांजली सावंत, अर्चना आंबेलकर, सुरेखा मांजिरकर, किरण गावडे, अनघा सावंत, देवयानी डेगवेकर, मैथिली सावंत, मानसी बांदेकर, वैष्णवी सातोस्कर, कामिनी कुडव, तनुजा देसाई, सुरेखा सातार्डेकर, अक्षता सावंत, रत्नप्रभा मोर्ये, चंद्रशिला परब, योगिता शिरोडकर यांनी परिश्रम घेतले.
बांद्यात पोषण आहार पंधरवडा अभियान…
